Navi Mumbai: नवी मुंबई महापलिकेने 130 शिक्षकांना दिले नारळ, कारण काय? VIDEO

130 Teachers Dismissed by Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महापालिकेने शिक्षकांची कमतरता असूनही १३० तासिका शिक्षकांना काढले आहे. यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत दोन वर्षांपूर्वी भरती केलेल्या तासिका शिक्षक १३० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना काढण्यात आलय. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची गरज असताना सुद्धा या शिक्षकांना शिक्षण विभागाकडून अजूनही नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाहीये. त्यामुळे याच शिक्षकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. आता आम्ही करायचं काय असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला असून महाराष्ट्र कर्मचारी युनियन इंटक प्रणित यांनी इशारा दिलाय की जर त्यांना पुन्हा घेतलं नाही तर आंदोलन केलं जाणार. तसेच या शिक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी व आम्हाला पुन्हा शाळेच्या कामात रुजू करावे अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com