Mumbai Local : मुंब्य्रात मुत्यूचं 'वळण'! मुंबई लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग

Mumbra Bridge Incident : मुंब्र्यात नव्याने बांधलेल्या पुलाजवळ लोकल ट्रेनमधून पडून अयान शेख या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तीव्र वळणावर ट्रेनला झटका बसल्याने तोल गेला. प्रवाशांनी पुलाला "मृत्यूचा सापळा" म्हणत रेल्वेवर टीका केली आहे.
Mumbai Local mumbra station Accident
Mumbai Local mumbra station Accident Saam TV News
Published On

Mumbai local Mumbra death News : मुंबई लोकलमधून पडून २१ वर्षीय तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी मुंब्रा येथे नव्याने बांधलेल्या पुलाजवळ लोकल ट्रेनला जोरदार झटका बसला, अन् तरूणाचा तोल गेल. त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकल अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव अयान शेख आहे. तो मुंब्रा येथे राहणारा आहे. कामावर जाण्यासाठी तो सकाळी ८ वाजता घरातून निघाला होता. पण साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाल्याची बातमी घरी धडकली. घरात एकच शोककळा पसरला. मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल आता डेथलाइन होत असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांमधून येत आहे.

लोकल ट्रेनमधील प्रवासी सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अयान शेख हा सकाळी अतिगर्दीच्या वेळीस डब्यातून प्रवास करत होता. आतमध्ये जागा नसल्यामुळे तो दारात उभे होता. नव्या मुंब्रा पुलाच्या उंच टप्प्यावर ट्रेन तीव्र वळण घेत असताना अचानक झटका बसला. यामुळे गर्दी आणि ट्रेनच्या हालचालींमुळे अयानचा तोल गेला आणि तो रुळांवर पडला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला असावा.

Mumbai Local mumbra station Accident
Shiv Sena UBT : पुण्यात ठाकरेंचे शिलेदार अडचणीत, माजी आमदारासह ३७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, कारण काय?

शेकडो मुंबईकरांप्रमाणेच तो कामावर जात होता. पण पुलाच्या वळणावर लोकल ट्रेनला झटका बसला. त्यावेळी धरायला हवी तेवढी जागा नव्हती. त्यामुळे तो खाली कोसळला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, असे एका सहप्रवाशाने सांगितले.

Mumbai Local mumbra station Accident
महिला कीर्तनकाराची आश्रमातच हत्या, दगडाने ठेचून घेतला जीव, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

अयानच्या मृत्यूनंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली. रेल्वे प्रवासी संघाने नव्या मुंब्रा पुलाला “मृत्यूचा सापळा” असं नाव देत टीका केली. कार्यकर्त्यांचा दावा आहे की, तीव्र वळण, पीक अवर्समधील गर्दी आणि पुलाची उंची यामुळे हा भाग अत्यंत धोकादायक बनला आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडतात. लोकल प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. दरम्यान, ९ जून रोजी गर्दीच्या वेळी याच ठिकाणी दोन लोकलमधील प्रवाशांच्या धडकेमुळे चार जणांचा मृत्यू झाला होता.

Mumbai Local mumbra station Accident
संतापजनक! IIT कॅम्पसमध्ये २० वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, फूड कोर्ट चालवणाऱ्याला बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com