Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking News: पुण्यात तरुणीचा प्रताप! मैत्रिणीला कोल्ड कॉफीतून गुंगीचे औषध दिलं, संधी साधत ६ लाखांवर डल्ला मारला

Pune Police: पुण्यामध्ये एका तरुणीने मैत्रिणीच्या घरी जाऊन ६ लाखांचे दागिने लुटल्याची घटना घडली. मैत्रिणीला कोल्ड कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन आरोपी तरुणीने मैत्रिणीच्या घरातील सोन्याचे दागिन्यावर डल्ला मारला आणि फरार झाली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये एका तरुणीने आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याच घरातील ६ लाखांचे दागिने लुटून तरुणी फरार झाली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी २५ वर्षीय तरुणीला अटक केली. पुण्यातल्या आंबेगावमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (२५ वर्षे) या तरुणीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या एमराईड सोसायटीमध्ये घडली. फिर्यादी तरुणी ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण घरी आली. यावेळी आरोपी तरुणीने येताना कोल्ड कॉफी सोबत आणली आणि तिने ती मैत्रिणीला प्यायला दिली. मैत्रिणीनं ऐवढ्या प्रेमाने कोल्ड कॉफी आणली म्हणून तिने कुठला ही विचार न करता ती पिऊन टाकली.

या कोल्ड कॉफीमध्ये आरोपी तरुणीने गुंगीचे औषध मिसळले होते. गुंगीचे औषध मिळाल्यामुळे फिर्यादी तरुणी बेशुद्ध पडली. याचाच फायदा आरोपी तरुणीने घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटाच्या ड्रॉव्हरमधील ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तिने तिथून पळ काढला. फिर्यादी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. आपली मैत्रीण असं करू शकते यावर तिला विश्वास बसत नव्हता.

त्यानंतर तिने याबाबतची चौकशी मैत्रिणीकडे केल्यावर आपणच तिच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आणि दागिने परत करते असे आश्वासन दिले. मात्र वारंवार विचारून सुद्धा मैत्रिणीने दागिने परत न दिल्यामुळे तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. भारती विद्यापीठ पोलिस आरोपी तरुणीचा शोध घेत असताना ही तरुणी पुणे स्टेशनवर असल्याचे त्यांना कळाले. तात्काळ त्यांनी पुणे स्टेशन गाठून तरुणीला अटक केली आणि तिच्याकडचे दागिने जप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT