Shocking 6 minor boys and girls missing from Navi Mumbai in 24 hours Police are searching Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: धक्कादायक! नवी मुंबईतून २४ तासांत ६ अल्पवयीन मुलं बेपत्ता; परिसरात खळबळ

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून गेल्या २४ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

Navi Mumbai Crime News

नवी मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून गेल्या २४ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये ४ अल्पवयीन मुली आणि २ मुलांचा समावेश आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. यापैकी एक अल्पवयीन मुलगा कोपरखैरणे येथील स्टेशनवर सापडला असून इतर मुलांचा शोध सुरू आहे.

या घटनेच्या पाठीमागे एखादी टोळी आहे का याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरातून एक मुलगी मित्राच्या वाढदिवसाला गेली जी परतली नाही. पनवेलमध्ये एक मुलगी सहकाऱ्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेली होती.

त्यानंतर ती देखील बेपत्ता झाली. कामोठे परिसरात एक मुलगी सोमवारी घरातून बाहेर पडली आणि ती बेपत्ता झाल्याचं समोर आलं. याशिवाय रबाळे येथून शाळेत निघालेली एक मुलगी आणि शौचालयात गेलेला एक मुलगा देखील बेपत्ता झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अचानक मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या पोलीस सर्व अल्पवयीन मुलांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT