Vinod Patil News: ...तर मराठा आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही; विनोद पाटलांनी सांगितल्या ३ महत्वाच्या बाजू

Vinod Patil on Maratha Reservation: मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार, असा विश्वास मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Vinod Patil on Maratha Reservation
Vinod Patil on Maratha ReservationSaam TV
Published On

Vinod Patil on Maratha Reservation

मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्यूरेटिव्ह याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

दरम्यान, मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळणार, असा विश्वास मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी विनोद पाटील सातत्याने न्यायालयीन लढा देत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vinod Patil on Maratha Reservation
Weather Update: मिचौंग चक्रीवादळाचा धोका वाढला; महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) क्यूरेटिव्ह याचिकेवर सुनावणी असल्याने ते छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. तत्पुवी विनोद पाटील यांनी व्हिडीओ जारी करत मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले विनोद पाटील?

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमचा संघर्ष सुरू आहे. आम्ही रस्त्यावर उतरलो, न्यायालयीन लढाई लढलो. राज्य सरकारने दोन वेळा कायदा करूनही मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही, अशी खंत विनोद पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टात आज क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज जर कोर्टाने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय दिला. तर त्याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. ते भारतात कुठेही चॅलेंज होऊ शकत नाही, असंही विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना विनोद पाटील म्हणाले, ज्या तीन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं होतं. त्यातील ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून केंद्राने ईडब्यूएसमधून १० टक्के आरक्षण दिलं आहे. दुसरा प्रश्न आरक्षणाचा अधिकार पुन्हा राज्याला बहाल करण्यात आला आहे.

तिसरा प्रश्न म्हणजे मागावर्गीय आयोगाच्या अहवालातून मराठा समाज मागासलेला आहे, हे आधीच सिध्द झालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आज नक्कीच आरक्षण मिळणार, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन विनोद पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत.

Vinod Patil on Maratha Reservation
IPL 2024 Auction: मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला संघात का घेतलं? खरं कारण आलं समोर...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com