Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : लोकलमध्ये मराठी - हिंदी भाषेवरून वाद, ५ जणांकडून बेदम मारहाण; तणावातून १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

Dombivli News : डोंबिवलीत हिंदीत बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीमुळे १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भाषिक वादामुळे युवकावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने मानसिक तणावात आत्महत्या केली.

Alisha Khedekar

  • लोकलमध्ये हिंदीत बोलल्यामुळे पाच १९ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण

  • मानसिक तणावामुळे विद्यार्थी घरी परतला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली

  • घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाषिक वाद तीव्र झाल्याची चर्चा

  • पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपी प्रवाशांचा शोध सुरू केला आहे

  • कुटुंबीयांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

राज्यात हिंदी मराठी भाषिक वादाचं वादळ दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजकारणापासून सुरु झालेला वाद आता गल्लीबोळात जीवघेणा ठरत आहे. अशीच एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाला लोकलमध्ये हिंदी भाषेत बोलताना मराठीत बोलता येत नाही का? विचारत पाच जणांनी जबर मारहाण केली. या नैराश्येतून या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव अर्णव खैरे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव खैरे याचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजिवन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णव याने हिंदीत थोडा आगे हो असे बोलला . इतक्यात आजुबाजुच्या चार ते पाच जणांच्या टोळयांनी तुला मराठी बोलात येत नाही का ? अशी विचारणा करत तु मराठी बोलण्याची लाज वाटते का असे म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले, पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. सायंकाळी ७च्या सुमारास वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अर्णव बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. त्यांनी अर्णवला वारंवार हाक मारूनही तो बाहेर आला नाही. म्हणून शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. अर्णवला तातडीने रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री ९:०५ वा. मृत घोषित केले.

यानंतर अर्णवच्या वडिलांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जवाब नोंदवला असून पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान लोकल मधील झुंडशाही ,मराठी हिंदी वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे .पोलिसांनी अर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रवाशांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णव च्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

Manoj Jarange: नार्कोटेस्टला येतो म्हणणारे लपलेत; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT