निवृत्ती बाबर
Uddhav Thackeray Group News : राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत असल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे.
राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना दिल्लीतून देखील बोलावणं आलं होतं. त्यानंतर राज्यपालांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलंलं वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होणर आहे.
राज्यात राज्यपालांकडून वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलने झाली. त्यानंतरही राज्यपालांच्या वक्तव्यावरून झालेला वाद थांबायचा नाव घेईना. राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 'राज्यपाल चले जाओ' आंदोलनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात येणार का, हे पाहावे लागणर आहे.
'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.
औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.