Raj Thackeray : 'राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे'; राज ठाकरेंच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

राज ठाकरेंच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे.
rahul gandhi and raj thackeray
rahul gandhi and raj thackeray saam tv

Raj Thackeray News : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले. या मुंबईत गोरेगावात राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर सावकरांवर केलेल्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. 'राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, अशी टीका ठाकरेंनी राहुल गांधींवर केली. (Latest Marathi News)

rahul gandhi and raj thackeray
Video : हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

राज्यपालांवर राज ठाकरेंचे टीकास्त्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर राज ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. 'राज्यपाल तुम्ही गुजराती आणि मारवडींना विचारा, तुम्ही महाराष्ट्रात का आले आहात ? तुम्हाला तुमचं राज्य नव्हतं का ? असा प्रश्न राज ठाकरेंनी राज्यपालांना केला.

हिंदुत्वच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

' एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली आणि सत्तांतर घडवलं. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहे. मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? भूमिका घ्यायच्या नाहीत. फक्त यांना सत्ता हवी आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली

मशीदेच्या भोंग्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'जिथे मशिदींवर भोंगे दिसतील तिथे पुन्हा एकदा मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले.

'बाळासाहेब जी भूमिका बोलत होते, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण मशिदींवरील भोंगे काढा असे नाही म्हणालो, तर हनुमान चालिसा लावू असं सांगितलं. पण अजून काही जणांची चरबी जिरलेली नाही, त्या धडा शिकवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

गेल्या १६ वर्षातील आंदोलनांची पुस्तिका काढणार; राज ठाकरेंनी केली घोषणा

'महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली

rahul gandhi and raj thackeray
Raj Thackeray: भोंगे दिसतील तिथे ट्रकमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पुन्हा आदेश

राहुल गांधींवर राज ठाकरेंनी साधला निशाणा

राहुल गांधीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, 'त्या दिवशी महाराष्ट्रात म्हैसूर सँडल आले होते. राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत. तुमची पात्रता तरी आहे का? सावरकराबद्दल बोलायची. आमची कृष्णनीती आम्हाला काय सांगते, एखादी चांगली गोष्ट घडवायची असते, तेव्हा स्टॅटर्जी ठरवली जाते'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com