Saamana Editorial on Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

Political News: मोदींनी फुगवलेला फुगा उद्या जनताच फोडणार; शिवसेना ठाकरे गटाची घणाघाती टीका

Shivsena vs BJP: देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर 'मोदी परिवार' अशी मोहिम सुरू केली. यावरून ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे.

Satish Daud

Saamana Editorial on Narendra Modi

पंतप्रधान मोंदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला देशातील १४० कोटी जनता हाच माझा परिवार, असं उत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं. यानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर 'मोदी परिवार' अशी मोहिम सुरू केली. यावरून ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो", असा टोला ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे. (Latest Marathi News)

"विरोधी पक्षांतील परिवारवादावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना दुसऱ्यापक्षांमधील कुटुंबशाही भाजप परिवारात आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही नाहीत. रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये नाही. मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे", अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

"मेरा देश मेरा परिवार हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी (Narendra Modi) त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे", असं सामना अग्रलेखात लिहण्यात आलं आहे.

"सोशल मीडियावरून तुमचा उदो उदो करणाऱ्या सायबर टोळय़ा हे तुमचे कुटुंब आहे. ‘मोदी मोदी’च्या नशेत तल्लीन ‘भगतगण’ म्हणजे तुमचा परिवार आहे. लोकशाहीमध्ये विरोधक, टीकाकार हेदेखील सत्ताधारी पक्षाने कौटुंबिक सदस्यच समजायचे असतात. मोदी राजवटीत हे चित्र कधीच दिसले नाही", असा घणाघात देखील सामना अग्रलेखातून करण्यात आलाय.

"कोरोनासारख्या भयंकर काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेमळ कुटुंबप्रमुखाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली. त्यामुळेच उद्धव ठाकरे आजही जनतेच्या मनात कायम आहेत. हीच सल ‘मेरा देश, मेरा परिवार’ म्हणणाऱ्यांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले", अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT