Maharashtra Politics: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटातच सुटला; शिंदे गटाला किती जागा मिळणार?

Mahayuti Seat Sharing Formula: महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ असून २०१९ च्या निवडणुकीत यापैकी ४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवता आला होता.
Maharashtra Political News in Marathi
Maharashtra Political News in MarathiSaam Tv
Published On

Maharashtra Political News in Marathi

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, दुसरीकडे महायुतीचा जागावाटपाचा तिढा अवघ्या ३० मिनिटात सुटला आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Political News in Marathi
CNG Price Mumbai: मोठी बातमी! मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ असून २०१९ च्या निवडणुकीत यापैकी ४१ जागा युतीने जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवता आला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि काँग्रेस तसेच अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली होती. (Latest Marathi News)

यंदाही भाजपने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचा निर्धार ठेवला आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुती सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्याने लोकसभेच्या जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता.

मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी हा तिढा फक्त ३० मिनिटातच सोडवला असल्याची माहिती आहे. अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी मंगळवारी (ता. ५) छत्रपती संभाजीनगर येथे जंगी सभा घेत लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचे फुकले. या सभेनंतर अमित शहांनी मुंबई महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शहा यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिला.

त्याचबरोबर भाजप लोकसभेत ३० जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला १२ जागा, तर अजित पवार गटाला ६ जागा मिळतील, असं अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.

Maharashtra Political News in Marathi
Cylinder Explosion: घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; लग्नाच्या वाढदिवशीच पती-पत्नीसह ५ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com