इंधनदरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. मंगळवारी (५ मार्च) मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचं प्रमाण वाढावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. महानगर गॅस लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात (CNG Price) प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागणार आहेत.
महागनगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दर कपातीच्या घेतलेल्या निर्णयाचं मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, एकीकडे सीएनजी दरात कपात करण्यात आली असली, तरी पीएनजीच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ऑक्टोबर महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात केली होती. त्यावेळी सीएनजीचे दर ३ रुपये तर पीएनजीचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते.
दरम्यान, उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागात सीएनजीच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळात निवडणुका देखील होणार असल्याने केंद्र सरकार इंधनाच्या किमती कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतं. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.