shivajirao adhalrao patil 
मुंबई/पुणे

सेनेला संपवू नका; शिवाजीरावांचा महाविकासच्या पक्षांवर राेख

हे कारस्थान जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील विराेधकांनी केले.

रोहिदास गाडगे

आंबेगाव : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीचे (Pune District Central Co-operative Bank Election) आज (रविवार) मतदान आहे. आज सकाळी पासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip valse patil आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalrao patil) यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आढळराव पाटील यांनी महाविकासच्या पुण्यातील कारभाराविषयी साम टीव्हीशी बाेलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीच्या (mva) तीनही पक्षांमध्ये अलबेल असल्याचे बोलले जाते मात्र याला पुणे (pune) जिल्हा अपवाद आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेवर (shivsena) अन्याय होत आहे. आम्हांला आणि कार्यकर्त्यांना जगू द्या, पुणे जिल्ह्यातून शिवसेना संपविण्याचं काम सुरु असल्याची खंत व्यक्त शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केली आहे.

बैलगाडी शर्यत डाेळ्यात खूपली

आढळराव पाटील म्हणाले अडीच वर्षात मला खूप वाईट अनुभव आले आहेत. खेडच्या पंचायत समितीच्या सभापतीस सहा महिने जेलमध्ये रहावे लागले. हे सत्ताधा-यांच्यामुळे झाले. आम्ही बैलगाडी शर्यत भरवली. ती डाेळ्यात खूपली आणि त्याची परवानगी नाकारली. हे कारस्थान जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील विराेधकांनी केले.

आमच्या नादी लागू नका

आम्हांला संपविण्याचा डाव रचला जात आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा आढळराव पाटील यांनी देतानाच आम्ही महाआघाडीचे सूत्र पाळत आहाेत. परंतु आमचे अस्तित्व राहू द्या असेही त्यांनी व्यक्त केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT