असे आहे Sindhudurg DCC चे नवे संचालक मंडळ; कार्यकर्ते खूष

या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याच लक्ष लागून राहिले हाेते.
sindhudurg dcc bank
sindhudurg dcc bank
Published On

सिंधूदूर्ग : नेहमी राजकीय दृष्ट्या चर्चेत असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ११ जागांवर विजय मिळवित सत्ता अबाधित ठेवता आलेली आहे. त्यांचे प्रमुख उमेदवार राजन तेली वगळता अन्य मातब्बरांचा विजय झालेला आहे. विराेधी महाविकास आघाडीस प्रमुख उमेदवार आणि बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पराभवासह ८ जागांवर समाधान मानावं लागले आहे. दरम्यान आपआपल्या गटाचे उमेदवार जिंकल्याने कार्यकर्ते आनंदित झाले असून फटाक्यांची आतषबाजी करीत आहेत. sindhudurg district bank election final result

sindhudurg dcc bank
ED ची चार्जशिट दाखल; अनिल देशमुख मुख्य आरोपी, मुलांचीही नावे

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg DCC bank election) यंदा १९ जागांसाठी मतदान ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हाेते. या बॅंकेचे ९८१ मतदार आहेत त्यापैकी ९६८ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला हाेता. यंदा प्रथमच बँकेची निवडणूक (election) चुरशीची झाली. या निवडणुकीत ११ जागांवर राणे गट तर ८ जागा मविआने जिंकल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बँकेच्या स्थापनेस सुमारे ३४ वर्षे झाली आहेत. त्यापैकी सुमारे १५ वर्षे बँकेत नारायण राणे (narayan rane) यांची एक हाती सत्ता आहे. यंदा देखील ती अबाधित राहिली आहे.

सिंधूदूर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतली विजयी उमेदवार (sindhudurg dcc bank)

शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

विठ्ठल देसाई (भाजप)

शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका

विद्याप्रसाद बांदेकर (मविआ)

शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

विद्याधर परब (मविआ)

शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका

व्हिक्टर डान्टस (मविआ)

शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका

मनीष दळवी (भाजप)

sindhudurg dcc bank
विजयाचा आनंद; नितेश राणे जनतेसमाेर येऊन म्हणाले गाडलाच..

शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप)

शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका

गणपत देसाई (मविआ)

शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका

दिलीप रावराणे (भाजप)

नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

सुशांत नाईक (मविआ)

sindhudurg dcc bank
अजित पवारांची भीती खरी ठरली; मविआचा उमेदवार पडला; भाजपचा जल्लाेष

महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप)

नीता राणे (मविआ)

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

आत्माराम ओटवणेकर (मविआ)

इतर मागास मतदारसंघात

रवींद्र मडगावकर (भाजप)

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

मेघनाथ धुरी (मविआ)

sindhudurg dcc bank
कणकवली : नितेश राणेंचा उल्लेख टाळत संताेष परब म्हणाले...!

सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ

अतुल काळसेकर (भाजप)

औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप)

मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ

महेश सारंग (भाजप)

विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

संदीप परब (भाजप)

कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ

समीर सावंत (भाजप)

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com