Sanjay Raut News SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut PC: MVA लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकणार, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार? संजय राऊत सविस्तर बोलले

Sanjay Raut : विरोधी पक्षाने एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात आणि काम करावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut PC: भाजपविरोधात विरोधी पक्षाची एकजूट व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष भाजप विरोधात एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष सर्व एकत्र येणे याला सुरुवात झालेली आहे ही आशादायी गोष्ट आहे. आगमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू असं वातावरण आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत  यांनी केला आहे.

एकीकडे विरोधक भाजप विरोधात एकवटले आहेत. मात्र विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार अद्याप त्याबाबत चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षाने एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात आणि काम करावं आणि निवडणुका जिंकाव्या हे महत्त्वाचं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. (Latest News Update)

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली हे चांगले संकेत आहेत. याआधी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे. (Political News)

मी आजच वाचलं की, राहुल गांधी हे ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते एकत्र येऊ नये हा भारतीय जनता पक्षाचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. त्यांचा हा भ्रम तुटणार आहे. 2024 मध्ये संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येणार, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT