सचिन बनसोडे
Ahmednagar News: वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता टीका केली आहे. 'राज्यघटनेची शपथ घेऊन काहीजण वेगळी भाषा बोलताय, अशी टीका थोरात यांनी केली आहे. (Latest Marathi News)
माजी महसूलंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन केलं. संगमनेर शहरातील अभिवादन कार्यक्रमास कन्या जयश्री थोरातही उपस्थित होत्या.
थोरात यांनी अभिवादन केल्यानंतर थोरात म्हणाल्या, बाळासाहेब थोरात म्हणाले, 'बाबासाहेबांनी मानवतेसाठी समतेचा संदेश दिला. दुर्दैवाने राज्यघटनेची शपथ घेऊन काही जण वेगळी भाषा बोलताय'.
'कोणा एकाची सत्ता, कोणा एकाच राष्ट्र असलं पाहिजे अशी भाषा वापरताय हे दुर्देवी आहे. या पद्धतीने देश पुढं जाणार नाही. राज्य घटनेची जागृती करण हाच संदेश आज दिला पाहिजे', नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुराष्ट्र वक्तव्यावर टीका थोरात यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे मातोश्री येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट केला होता. यावरून राजकारण तापलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांचं व्यक्तिमत्व थापा मारणार नाही. जी वस्तुस्थिती आहे, तीच त्यांनी मांडली असावी . मी त्यांना जवळून ओळखतो'.
देवेंद्र फडणवीस हिंदुराष्ट्रावर ट्विटमध्ये काय म्हटलं होतं?
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, 'कुणाला काय वाटते, याच्याशी आम्हाला काय करायचे? वीर सावरकरांची भूमिकाच आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे तुम्ही याला हिंदूराष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका... हे हिंदूराष्ट्रच आहे!'. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.