Sanjay Raut- Sanjay Shirsath
Sanjay Raut- Sanjay Shirsath Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: 'कुत्रं पिसाळलं म्हणून...', संजय शिरसाटांची जहरी टीका; शिंदे गटाची संजय राऊतांविरोधात जोरदार फिल्डिंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज शिंदे गटाच्या (Shivsena) आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. शिरसाट यांनी संजय राऊत यांचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा म्हणून केला आहे.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देणे आम्ही महत्त्वाचे समजत नाही. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि धनुष्यबाण अधिकृतरित्या दिलं आहे. आज बैठकीतही बरीच चर्चा झाली आहे. संजय राऊत अपात्र कसे होतील यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचं, संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

मुंख्यमत्री एकनाथ शिंदेंबद्दल संजय राऊतांनी जी भाषा वापरली आहे, त्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. त्यांनी जी भाषा वापरली आहे त्यांना त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो. मात्र आमची ती संस्कृती नाही. हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

संजय राऊतांना आता कितीही आरोप करुद्या. आठ दिवस थोडं थांबा संजय राऊतंना उत्तर दिलं जाईल. कुत्रं पिसाळलं म्हणून कुत्र्याला चावत असतात का? असा सवाल उपस्थित करत त्याला एखादं औषध देऊन शांत करु, असा इशाराही शिरसाट यांनी राऊतांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

SCROLL FOR NEXT