Neelam Gorhe saam tv
मुंबई/पुणे

मुंबईच्या साकीनाका बलात्कार प्रकरणी पीडितेला अखेर न्याय मिळाला - डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करुन तिला जबर जखमी करण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करुन तिला जबर जखमी करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्या पीडितेचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. या गंभीर घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. तसंच सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध करुन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर (Dindoshi session court) दिंडोशी सत्र न्यायालयाने आज आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावत महत्वपूर्ण निकाल दिला. कोर्टाच्या या निकालाचे स्वागत होत असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती (Neelam gorhe) डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणावर बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणी आज कोर्टात निकाल जाहीर झाला आहे. या प्रकरणी आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयात फाशीची शिक्षा (Sentenced to death) सुनावली आहे.या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने केलेल्या कार्यवाही बद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (uddhav Thackeray), राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आभार व्यक्त करीत आहे. यामुळे निर्दोष मुलीला जीवाला मुकावे लागल्याची खंत मनात आहेच,पण ही शिक्षा जाहीर झाल्याने तिच्यावरील अन्यायाला काही प्रमाणात का होईना न्याय मिळाल्याची भावना मनात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री आरोपी मोहनने एक महिलेवर बलात्कार करुन तिला जबर जखमी केले होते. राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेला उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही पीडितेचे प्राण वाचू शकले नाही. या गंभीर घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.दरम्यान, आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहानला बलात्काराच्या आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT