मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा; औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून उद्धव ठाकरेंच्या सूचना

मला कारणे सांगत बसू नका, परिस्थितीवर तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादमधील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Uddhav thackeray
Uddhav thackeraySaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई: मला कारणे सांगत बसू नका, परिस्थितीवर तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादमधील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे, त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा सूचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. औरंगाबादच्या (Aurangabad) पाणी प्रश्नावर (Water Crisis) मुख्यमंत्री यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री;

औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या १६८९ कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घेण्यात यावा. तसेच या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन (Maharashtra Government) काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

Uddhav thackeray
मोसमी पाऊस 2 दिवसांत कोकणात धडकणार; IMDचा अंदाज, राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

तसेच, या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशारा मुख्यमंत्री यांनी यावेळी दिला आहे.

औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी आठ दिवसांतून एकदा पाणी येते. त्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर पाणी प्रश्नाने हैराण आहेत. याच प्रश्नावरून वर्ष निवास्थानी झालेल्या आजच्या बैठकीत औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे देखील ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

हे देखील पाहा-

दरम्यान, शहरातील पाणी प्रश्न गेल्या महिन्याभरापासून गंभीर बनत चालला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून अधिकाधिक प्रयत्न केले जात आहे. यामध्ये प्रशासनाला यश सुद्धा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही अनेक भागात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरीकांमधून रोष व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे पाण्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com