यंदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देण्यात आला होता. तर, हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाचा पाऊस 103 टक्के बरसणार आहे. त्यामुळे आता राज्यात मोसमी पावसाच्या प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. हवामानाच्या अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे दोन दिवसांत तळकोकणात दाखल होणार असा असा अंदाज हवामान विभागाने (IMD) बुधवारी जाहीर केला. दरम्यान, राज्याच्या काही भागांत काल बुधवारी अवकाळी पाऊस झाला आहे. (Maharashtra Rain Update)
मोसमी पावसाने 29 मे रोजी केरळमध्ये (Kerala) प्रवेश केला होता. हवामानाच्या अनुकूल स्थितीमुळे अतिशय वेगाने मनुसूची आगेकूच आहे. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहचण्याची चिन्हे असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कोकणाबरोबरच (Konkan) मध्य अरबी समुद्राचा (Arabian Sea) काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, तामिळनाडूचा काही भाग ,बंगालच्या उपसागरातील (Bay Of Bengal) दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य, ईशान्य भागासह देशाच्या ईशान्य काही राज्ये, सिक्कीम, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या काही भागातही दोन दिवसांत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मोसमी पावसाचा प्रवास अनुकूल होण्यासाठी उत्तर बंगालचा उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली असून यामुळे हवेचा वेग वाढला आहे. बंगालच्या उपसागरापासून ते ईशान्य भारतातील काही राज्यापर्यंत वाऱ्यांचा वेग जोरदार असणार आहे. चक्रीय स्थितीमुळे आसाम, मेघालय, हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम अरूणाचल प्रदेश, या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मात्र, राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होऊ शकतो. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, परभणी या जिल्ह्यात वादळीवारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.