राज्यातील 'या' जिल्ह्यात 101 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोयचं नाही! मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...

तर राज्यातील 349 गावांसह 913 वाड्यांना 353 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू...
Beed Water Issue, Beed Latest Marathi News, Gulabrao Patil News
Beed Water Issue, Beed Latest Marathi News, Gulabrao Patil Newsविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड: जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 101 गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजनेतून पिण्याच्या पाण्याची सोय झालीच नसल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे या गावकऱ्यांना बोअर आणि विहीरींचा आधार घ्यावा लागत आहे. तर या गावातील पाण्याचा प्रश्न जल जीवन मिशन अंतर्गत सोडवण्याचा प्रश्न प्रशासन आणि शासनाकडून होत आहे. (Beed Latest Marathi News)

जिल्ह्यातील 1 हजार 367 गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी, प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी देण्याचे शासन नियोजन करत आहे. नुकतीच मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत 101 गावांसह जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल याची व्यवस्था करणार असल्याचे सांगण्यात आलंय.

Beed Water Issue, Beed Latest Marathi News, Gulabrao Patil News
काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, 48 तासांत दुसरी घटना!

यासाठी, जिल्हा प्रशासनाने काटेकोर, विनाविलंब नियोजन करावे, जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना नसलेल्या 101 गावांना प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने आता मिशन मोडवर काम करावे. परळी येथील जलकुंभसाठी निधी उपलब्ध करून देणार असून त्याचा आराखडा तयार करावा, जिल्ह्यात आवश्यक तिथे सोलर यंत्रणा उभी करण्यासाठी जागा निश्चित करावी. पिण्याच्या पाण्यासाठी बीड जिल्ह्याला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या आठवड्यापर्यंत राज्यातील पाच विभागातील 281 गावांसह 738 वाड्यांना 270 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. या आठवड्यात मात्र या संख्येत वाढ झाली असून त्यामध्ये 68 गावांसह 175 वाड्याची आणि 83 टँकर्सची संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळं राज्यात सद्यस्थितीत 349 गावांसह 913 वाड्यांना 353 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

हे देखील पहा-

औरंगाबाद विभाग - 14 गावांसह एका वाडीत 24 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

अमरावती विभाग - 41गावांना 41 टँकर्स पाणीपुरवठा सुरू आहे.

कोकण विभाग - 111 गावांसह 366 वाड्यांना 78 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

नाशिक विभाग - 73 गावांसह 86 वाड्यांना 72 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

पुणे विभाग - 42 गावांसह 285 वाड्यांना 55 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.

दरम्यान, मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी राज्यातील अनेक गावांमध्ये, आजही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आणि दाहकता कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com