काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, 48 तासांत दुसरी घटना!
Twitter/@ANI

काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, 48 तासांत दुसरी घटना!

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढत चालल्या आहेत. दहशतवाद्यांकडून बँकेत घुसून व्यवस्थापकावर (Manager) गोळीबार करण्यात आला आहे.
Published on

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढत चालल्या आहेत. दहशतवाद्यांकडून बँकेत घुसून व्यवस्थापकावर (Manager) गोळीबार करण्यात आला आहे. राजस्थानचे रहिवासी असलेले व्यवस्थापक विजय कुमार यांना कुलगाममधील बँकेत घुसून गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला.

काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, 48 तासांत दुसरी घटना!
सांगली: सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; 23 लाख 50 हजाराचा माल जप्त

अलीकडे मंगळवारीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांकडून सरकारी शाळेतील काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच यापूर्वी बडगाममध्ये तहसील आवारात घुसून कर्मचारी राहुल भट यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू असून ते स्वत:ची सुरक्षा स्वत:ची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत.

तर, खोऱ्यातील हिंदू नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. अलीकडेच, बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट आणि कुलगाममध्ये महिला शिक्षिकेच्या हत्येविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. सर्व स्थलांतरित सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी तैनात करावे, अशी यावेळी काश्मिरी पंडितांची मागणी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com