सांगली: सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या गोदामावर छापा; 23 लाख 50 हजाराचा माल जप्त

इस्लामपुरात सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात विक्री करणाऱ्या गोदामावर कृषी विभागाचा छापा.
Seeds confiscated
Seeds confiscatedSaam Tv
Published On

विजय पाटील

सांगली: बोगस बियाणे बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने इस्लामपूर येथे छापा मारून २३ लाख ५० हजाराचे सोयाबीन बियाणे जप्त केलेय. गरूड सिडस् या नावाने २५ किलोच्या पिशवीतून हे बियाणे सिलबंद करण्यात येत होते. या प्रकरणी कंपनी मालक प्रणव हसबनीस यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime News)

Seeds confiscated
Pune : सुट्टीसाठी कायपण! हवालदाराने असं कारण सांगितलं की, अधिकारीही पडले बुचकळ्यात

पेरणी हंगामात बियाणे, खते विक्री करून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने पथके नियुक्त केली आहेत. या पथकाने इस्लामपूरमध्ये गरूड सिडस् या बिजोत्पादक कंपनीच्या गोदामावर मंगळवारी छापा मारला आहे.

हे देखील पहा-

यावेळी सोयाबीनच्या केडीए ७२६ जातीच्या बियाणाची २५ किलोच्या पिशवीमध्ये भरणी सुरू होती. यावेळी तेथे हजर असलेल्या गोदाम मालकाकडे बिजोत्पादन परवाना, प्रमाणीकरण आहे का अशी विचारणा केली असता यापैकी कागदपत्रे उपलब्ध होउ शकली नाहीत. तसेच बिजोत्पदनासाठी खरेदी केलेल्या सोयाबीनच्या खरेदी पावत्याही नव्हत्या. यामुळे हे बियाणे बोगस (Seed bogus) असल्याच्या संशयावरून जप्त करून सील करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com