विनोद जिरे
बीड: जिल्ह्यात अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (Shivsena) नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना घरचा आहेर दिला आहे. (Sugarcane strain beed)
'स्वतःच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस संपला की कारखाना बंद केला. शेतकऱ्याचं उसाचे टिप्परू शेतात राहू देणार नाही. या वल्गना फुसक्या ठरल्या... शेतकऱ्यांसमोर आज हे उघडे पडले आहेत', असे म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केलीय. तसेच शेतकऱ्याच्या शेतात उभा असलेल्या ऊसाला सरकारने मदत करावी. अशी देखील मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी केलीय.
बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हजारो शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, की शेतकऱ्याचं उसाचे टिप्परू शेतात राहू देणार नाही. मात्र मुंडें यांनी गाळपासाठी घेतलेल्या आंबा सहकारी साखर कारखान्याचे गाळप बंद केले आहे. त्यामुळे यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी धनंजय मुंडेंना चिमटा काढत घरचा आहेत दिला आहे.
हे देखील पाहा-
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.