Kalyan Dombivali Political News saam tv
मुंबई/पुणे

KDMC Politics : ठाकरे सेनेचा धक्कादायक निर्णय! नवनिर्वाचित नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

Kalyan Dombivali Political News: कल्याणमधील ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्ष आदेशाचे उल्लंघन आणि बैठकींना अनुपस्थित राहिल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे केडीएमसी राजकारणात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी

  • बैठकींना अनुपस्थिती आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन हा मुख्य आरोप

  • केडीएमसीमध्ये ठाकरे गटाचे आता १० नगरसेवक उरले

  • या निर्णयामुळे कल्याणच्या राजकारणात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Dombivli Madhur Mhatre News कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वारंवार नोटीस देऊनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे, तसेच पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी मधुर म्हात्रे हे निवडून आल्यापासूनच शिवसेना शिंदे गट यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

मात्र, नोटीस देऊनही मधुर म्हात्रे यांनी पक्षाच्या नाव नोंदणीसह गटाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही. इतकेच नव्हे तर पालिकेच्या महासभेच्या दिवशीही पक्षाने दिलेला आदेश धुडकावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अखेर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

या कारवाईनंतर केडीएमसीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आता १० नगरसेवक शिल्लक राहिले असून पक्षशिस्त पाळण्याबाबत इतर सदस्यांना देखील स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT