Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या, टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार; कल्याण हादरले

Kalyan Crime: कल्याणमध्ये शिवसेना नेत्याची हत्या करण्यात आली. टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात शिवसेना नेत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Priya More

Summary -

  • कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण घोरड यांची धारदार शस्त्राने हत्या

  • मामणोली गावाजवळ महामार्गावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

  • उपचारापूर्वीच किरण घोरड यांचा मृत्यू

  • घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वातावरण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. टोळक्यांनी धारदार शस्त्राने वार करत शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण घोरड यांच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या घनटेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची धारदार शस्त्रांनी वार करत निघृण हत्या करण्यात आली. टिटवाळ्यातीली गोवेली येथील ते रहिवासी होते. किरण घोरड यांच्यावर एका टोळक्याने अचानक राडा घालत जीवघेणा हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर अनेक वेळा वार करण्यात आले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कल्याण तालुका पोलिसांनी किरण यांच्या हत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासणी आणि इतर धागेदोरे यांच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घएत आहे. पोलिसांकडून या प्रकरणी काही संशयितांची चौकशीही करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हत्याप्रकरणी राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पुढील तपास कल्याण तालुका पोलिस करत आहेत. पूर्ववैमनस्यातून किरण यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे माणगाव महामार्गावर वाहतूक कोंडी

NPS Scheme: ५० हजारांची पेन्शन अन् ४ कोटी एकाचवेळी; NPS योजनेतील गुंतवणूक करेल मालामाल; कॅल्क्युलेशन वाचा

Ikkis Cast Fees : धर्मेंद्र ते अगस्त्य नंदा 'इक्कीस'साठी कोणाला किती मिळाले मानधन?

US Venezuela conflict : नव्या वर्षात नव्या युद्धाची सुरूवात? राजधानीवरच हल्ला, लोक गाढ झोपेत असताना ७ स्फोट

Amitabh Bachchan: केबीसीच्या मंचावर बिग बींच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाले, 'सगळं काही जणू कालच घडल्यासारखं...'

SCROLL FOR NEXT