Dombivli Railway Station saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Railway Station : पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात शेड, मग डोंबिवलीत का नाही? शिवसेनेचा रेल्वे प्रशासनाला इशारा

Dombivli Railway Station update : पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात शेड बांधण्यात आले आहेत. मात्र, डोंबिवली स्टेशनमध्ये बांधण्यात आलेलं नाही. यावरुन शिवसेनेने रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. डोंबिवलीच्या पाच नंबर प्लॅटफॉर्मवरील शेडसाठी अनेक दिवसांपासून तक्रारी करत आहोत. त्यात पावसाळाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या रेल्वे स्थानकात डोंबिवलीच्या आधी शेड बांधण्यात आलंय. मग डोंबिवलीसाठी शेड का नाही, असा जाब शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली रेल्वे स्टेशन मास्तरांना विचारला आहे.

डोंबिवलीतील प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी लोकलने ये जा करतात. मात्र रेल्वे स्थानकावर प्रवाशांना असुविधांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांनी याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह डोंबिवली रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तरांची भेट घेतली होती.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकावर एफओबीचे काम चालू आहे, त्या ठिकाणी लोकलचा महिला डबा थांबतो. त्यामुळे महिलांना ये जा करताना अडचण होते. महिलांना ये जा करण्यासाठी मुबलक जागा कशी उपलब्ध होईल, त्यासाठी प्रयत्न करा. गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पाच नंबर प्लॅटफॉर्मवर वर्षानुवर्ष शेडचे काम अर्धवट आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर शेडचे काम का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणगावमध्ये सशस्त्र दरोडा, महिलेची हत्या

Lumpy Disease : धुळे जिल्ह्यात लंम्पी संसर्ग वाढला; तीन किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

Maratha Reservation: ...तर त्या नेत्यांवर बहिष्कार टाकू, लक्ष्मण हाकेंच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; पाहा VIDEO

Palmistry: तुम्ही किती वर्ष जगणार? तुमच्या हातांवरील रेषांमध्ये दडलंय रहस्य, पाहा कसं पाहू शकता?

SCROLL FOR NEXT