Raj Thackeray news  Saam tv
मुंबई/पुणे

Shiv Jayanti 2023 : राज ठाकरेंनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा; बाळासाहेबांनी काय सल्ला दिला होता?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हीजेटीआय कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हीजेटीआय कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमातील मुलाखतीत राज ठाकरे यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाचा किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देखील दिला.

व्हीजेटीआय कॉलेजच्या रंगवर्धन कार्यक्रमात मुलाखतीवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी भाषणाचा किस्सा सांगताना म्हणाले, ' माझा ज्यावेळी भाषणाचा दिवस असतो, त्या दिवसासारखा वाईट दिवस कोणताही नसतो. हाताला मुंग्या आलेल्या असतात. हातपाय थंड पडलेले असतात. हातपायाला घाम आलेला असतो. त्याच कारण म्हणजे मला माहीत नसतं, मी काय बोलणार आहे. कित्येकदा नोट्स काढून पोडिअमला लावलेल्या असतात, मात्र, कधी कधी ते सोडून सर्व काही बोललो आहे. माझ्या भाषणावर घरच्यांची कृपा आहे. मी ठरवून भाषण करत नाही. मला मनातलं वाटतं ते बोलतो'.

'मी पहिलं भाषण केलं, तेव्हा मोर्चा होता. मोर्चा संपला. त्यावेळी कोणी सांगितलं की, माँ आली आहे. माझं भाषण ऐकायला माँ मीनाताई आली होती. त्या भाषण ऐकायला आल्या होत्या. भाषणानंतर त्या म्हणाल्या चल काकानं बोलावलं, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

'ही गोष्ट १९९५ ची आहे. त्यावेळी बाळासाहेब मला म्हणाले, माझ्या बापाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी सांगतोय. मैदानातल्या लोकांची भाषा बोल. स्वत: शहाणं होण्यापेक्षा ते कसे शहाणे होतील हे बघ. मी व्यंगचित्र म्हणून जे मला दिसतंय ते अनेकदा माझ्या भाषणात दिसतं , असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

राज ठाकरे पुढे म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मी शिववेडा आहे. आपला वारसा आपण जोपासल्या पाहिजेत. औरंगाजेब बादशहा इतका मोठा होता,तो आग्र्यानंतर शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) मारायला आला होता.

'१६८० ला महाराजांचं निधन झालं. तर १६८१ ला इथं औरंगजेब आला आणि २७ वर्षांनंतर मेला. औरंजेबाच्या काही पत्रात वाक्य आहे की, शिवाजी महाराज अजून मला छळताय. औरंगजेबाला शिवाजी महाराजांचा विचार मारायचा होता. मात्र,तो मेला नाही. आपण १२५ वर्ष हिंद प्रांतावर राज्य केलंय, ते मराठेशाहीनं केलं आहे', असेही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा हाहाकार! १६ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट, मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Bhandara : रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर धक्कादायक प्रकार आला समोर; मुलीच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखलगुन्हा दाखल

Maharashtra Rain Live News: रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला; आंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली

सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT