Shiv Jayanti 2023 : शिवप्रेमींना शिवनेरीवर प्रवेश नाकारण्यावरून संभाजीराजे नाराज; मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

शिवप्रेमींना प्रवेश न दिल्याने त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023 Saam Tv
Published On

Shivaji Maharaj Jayanti : पुण्यातील छत्रपची शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. राज्य सरकारकडून या शासकीय सोहळ्याचं आयोजन केलं जातं. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी अनेक शिवप्रेमी शिवनेरीवर येतात. मात्र, या शिवप्रेमींना प्रवेश न दिल्याने त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

सर्व तरुण शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) शिवनेरी किल्यावर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोपही केला.

Shiv Jayanti 2023
Ajit Pawar : गिरीश बापट यांना प्रचारासाठी आणल्याने अजित पवारांनी व्यक्त केला संताप; म्हणाले...

त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले,'संभीजीराजे छत्रपती यांना विनंती आहे की, आपल्या भावना आम्ही ऐकल्या आहेत. हे तुमचंच सरकार आहे. शिवाजी महाराजांच्या विचारावर सरकार स्थापन झालं आहे. आपल्या भावनांची आणि शिवभक्तांच्या भावनांची आम्ही कदर करतो'.

Shiv Jayanti 2023
Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना अल्टिमेट...; पुढील वर्षी शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा न दिसल्यास उचणार मोठं पाऊल

'शिवनेरी किल्यावर प्रवेश आणि दर्शनाबद्दल आपण भावना व्यक्त केल्या याची नोंद मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. रायगडावर जोमात काम सुरू आहे. त्यात तु्म्ही पुढाकार घेतलेला आहे. या राज्यातील जेवढे गडकोट किल्ले आहे, त्याचा इतिहास जपण्याचं सरकार काम पूर्णपणे प्रयत्न करेल. पुढच्या वेळी नियोजन सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com