Uddhav Thackeray News  Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत; उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर सिंह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील नाहर सिंह परिवाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उत्तर भारतीय समुदायाला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाले, 'सब ठीक बा! ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल. मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. सगळ्या भारतीयांना उत्तर हवं आहे. २५-३० वर्ष आम्ही युतीमध्ये राहिलो, काय मिळालं?

आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहे. आम्ही या ठिकाणी तुमची साथ मागायला आलो आहोत. यात गैर काय? असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच्याही घरात जाऊन भाकरी भाजतात. मी कधीच मराठी-अमराठी किंवा हिंदू मुस्लीम असा भेद केला नाही. बाळासाहेब कधीच असं म्हणाले नाहीत की हिंदू म्हणजे केवळ मराठी. बोहरा समाज देखील आमच्यासोबत आहे, असे ठाकरे म्हणाले.

'मी तिथे गेलो असतो तर मी हिंदुत्व सोडलं म्हटलं असतं. पण काल गेले ना भाकरी भाजायला. मग त्यांनी केलं तर बडे दिलवाला. आम्ही केलं की हिंदुत्व सोडलं. आमचं हृदय मोठं नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

'आम्ही भेटलो तर राम-राम म्हणतो. तुम्ही भेटला की जय श्री राम म्हणता. म्हणजे राम आहेच. तर आपल्यासोबत मुस्लीम लोक देखील सोबत आहेत. आता एकजूट करण्याची गरज आहे. हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घ्या. आम्ही तयार आहोत,असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला (BJP) आव्हान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; आता भाजप घेणार हरकती, नेमकं काय घडलं?

MIDC Factory fire : चिपळूण एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, VIDEO

Maharashtra Live News Update : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर आज पुन्हा एकदा आले एकत्र

Shocking : इंजिनीअर तरूण लैंगिक समस्येनं हैराण, जडीबुटीवाल्या बाबाकडं गेला अन् ४८ लाखांना फसला, किडनीही फेल

Lemon Rice Recipe: पारंपारिक पद्धतीचा लेमन राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT