Manasvi Choudhary
आजकाल चेहरा धुण्यासाठी सर्वजण फेसवॉश वापरतात. मात्र फेसवॉशने चेहरा धुताना योग्य काळजी घ्या.
चुकीच्या पद्धतीेने फेसवॉशचा वापर केल्यास त्वचा कोरडी होते व पिंपल्स येऊ शकतात.
चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फेसवॉश योग्य पद्धतीने वापरा.
चेहरा धुण्यापूर्वी तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. जर हातावर घाण किंवा बॅक्टेरिया असतील, तर ते चेहऱ्यावर पसरू शकतात आणि त्वचा खराब होऊ शकते.
चेहरा धुण्यासाठी खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरू नका. कोमट पाणी वापरा.
कोमट पाण्यामुळे त्वचेची छिद्रे हलकी उघडतात, ज्यामुळे फेसवॉश त्वचेच्या आत जाऊन घाण आणि तेल काढू शकतो.
फेसवॉश थेट चेहऱ्यावर लावू नका हातावर फेसवॉश घेऊन पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावर फेसवॉश लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. नाक, कपाळ आणि हनुवटी या भागावर मसाज करा.
फेसवॉशने चेहरा धुताना वरील काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे हे लक्षात असुद्या.