Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांसह २३ जणांना आंदोलन करणं भोवलं; कारागृहात रवानगी होण्याची शक्यता

स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह 23 जणांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणं चांगलंच भोवलं आहे.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkarsaam tv
Published On

संजय जाधव

Ravikant Tupkar News : स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह 23 जणांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणं चांगलंच भोवलं आहे. कोर्टाने रविकांत तुपकर यांच्यासह २३ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविकांत तुपकर यांच्यासह २३ जणांसाठी बुलढाणा कारागृहात जागा नाही. त्यामुळे सर्व आरोपींची अकोला अकोला किंवा अमरावती रवानगी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

स्वाभिमानीचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह १८ जणांविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल केले होते. बुलढाण्यात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आत्मदहनाचा प्रयत्न केसा होता. प्रकरण चिघळल्यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता.

या प्रकरणात पोलिसांनी 18 जणांवर रात्री उशिरा दंगलीचे गुन्हे दाखल केले होते. आज दुपारी बुलढाणा न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, आज बुलढाणा सत्र न्यायालयाने रविकांत तुपकर यांच्यासह २३ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Ravikant Tupkar
Latur Crime : धक्कादायक! मित्राच्या मदतीने काढला सख्ख्या भावाचा काटा; डोक्यात गोळी झाडून हत्या

रविकांत तुपकर यांच्यासह 23 जणांना बुलढाणा (Buldhana) कारागृहात जागा नसल्याने सर्व आरोपीना अकोला किंवा अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्याची शक्यता आहे. तीन आरोपींनी न्यायाधीशांकडे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची तक्रार करत अंगावरील वळ दाखवले. त्यामुळे न्यायाधीश वामन दी जाधव हे त्यावर काय भूमिका घेतात यावर सर्वांचे लक्ष आहे.

Ravikant Tupkar
Nandurbar Crime : रेल्वेत चाकूचा धाक दाखवत करायचे चोरी; लोहमार्ग पोलीसांनी 48 तासात आवळल्या मुसक्या

दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या कारवाईवर त्यांच्या आई गीताबाई तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या मुलाने कुठे डाका टाकला का, गुंड आहे का, त्याने बँक लुटली का, मग त्याच्यावर असा लाठीचार्ज का केला, असा सवाल तुपकर यांच्या आईने केला.

रविकांत तुपकर यांचा जन्म संघर्षासाठी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. माझ्या मुलाने खोके आणले का, पोलीस दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे आंदोलन चिरडले गेले. आम्ही पिकवतो,तेव्हा सर्व खातो, अशी संतप्त प्रतिक्रिया यांच्या मातोश्री गीताबाई तुपकर यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com