Amit Shah: अमित शाह पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार नाहीत! विरोधकांच्या आरोपांना भाजपचं उत्तर

Amit Shah In Pune: पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाहांना यावं लागतंय अशी टिका विरोधकांकडून भाजपवर करण्यात येत होती.
Amit Shah Pune News
Amit Shah Pune Newssaam tv
Published On

>>सचिन जाधव

Amit Shah Pune News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या १८ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे विरोधकांकडून पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाहांना यावं लागतंय अशी टिका भाजपवर करण्यात येत होती. त्यानंतर आता भाजपकडून याबाबात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पोटनिवडणुकीच्या कुठल्याही प्रचारात अमित शाह उतरणार नाहीत असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिले आहे.

पुण्यातील कसबा आणि चंचवड विधानसभा मंतदारसंघातील पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीचा प्रचार युती सरकार आणि मविआकडून जोरात सुरू आहे. या दरम्यानच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात येणार आहे. त्यांचा हा दौरा याच पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे मानले जात आहे. (Tajya Batmya)

Amit Shah Pune News
Anurag Thakur : शिंदेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुसऱ्यांदा करणार दौरा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन १८ तारखेला अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देखील उपस्थितीत राहणात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अमित शाह याच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हा पुस्तक प्रकाशन सोहळा म्हात्रे पुलावरील पंडित फार्म येथे पार पडणार आहे.

अमित शाह यांच्या या दौऱ्याआधी भाजपकडून ही माहिती देण्यात आली आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचे उद्घाटन होणार असून निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नसेल अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पोट निवडणुकीच्या कुठल्याही प्रचारात अमित शहा उतरणार नाहीत असे जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

Amit Shah Pune News
Eknath Shinde : 'संजय राठोड अडचणीत होते, तेव्हा...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

तसेच अमित शाह यांचा हा कार्यक्रम कसबा मतदार संघात नाही तर कोथरूड मतदार संघात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी त्या आरोपात तथ्य नाही. अमित शाह निवडणुकीच्या प्रचारात उतरणारच नाहीत. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे, असेही ते म्हणाले. (Maharashtra Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com