Eknath Shinde : 'संजय राठोड अडचणीत होते, तेव्हा...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेत भाषणाला सुरूवात केली. बंजारा समाजाच्या मेळाव्यात अनेत विकासकामांच्या निधींची घोषणा केली.
Eknath Shinde News
Eknath Shinde News Saam tv
Published On

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेत भाषणाला सुरूवात केली. बंजारा समाजाच्या मेळाव्यात अनेत विकासकामांच्या निधींची घोषणा केली. तसेच यावेळी संजय राठोड यांच्या प्रकरणाचा उल्लेख राठोड अडचणी आले होते. तेव्हा तुम्ही साथ दिली. आम्ही दोघंही संजय राठोड यांच्यापाठीशी उभे आहोत, असं उपस्थित बंजारा समाजाच्या नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सेवाध्वज स्थापना, संत सेवालाल महाराज पुतळा अनावरण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Eknath Shinde News
Bhagat Singh Koshyari Resign : भाजपच्या वरिष्ठांचा दबाव असल्याची राज्यपालांनी दिली होती कबुली; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

संजय राठोड प्रकरणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'संजय राठोड जेव्हा अडचणीत होते. तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. आम्ही दोघंही संजय राठोड यांच्या पाठीशी उभे आहोत. मी दुसरा कुणी नाही. तुमच्याच घरातला एक सदस्य आहे'.

Eknath Shinde News
Bhagat Singh Koshyari Resign : राज्यपाल भवन हे 'भाजप भवन' झालं होतं, महाराष्ट्र पापातून मुक्त झाला - नाना पटोले

'आम्ही या समाजाला भरभरून दोन्ही हातांनी देणार आहोत. तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या आहेत. आपल्या ज्या मागण्या आहेत. ज्यातून समाजाची प्रगती होईल, उन्नती होईल. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू होताच नागरिकांनी काढता पाय घेतला. त्यावेळी नागरिकांना थांबविण्यासाठी स्वत: मंत्री संजय राठोड यांना नागरिकांमध्ये जावं लागलं.

आता पोहरा गावातही रेल्वे येईल : देवेंद्र फडणवीस

आजच्या बंजारा समाजाची परिस्थिती फारशी चांगली नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तांड्याचा जो आरखाडा आखलेला आहे. तो शंभर टक्के पूर्ण करू, विकास हा त्या तांडयापर्यंत आणू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

'नाॅन क्रिमिनलची मागणी ही योग्य आहे. पण ती तपासून घ्यावी लागेल. नाॅन क्रिमिनल न लावण्याची मागणी ही तपासून त्या मागण्याची घोषणा करू. वर्धा वाशिम रेल्वे योजना मंजूर केली आहे . आता पोहरा गावातही रेल्वे येईल आणि या परिसराता विकास होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'बंजारा समाजासाठी एक महामंडळही सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत. आम्ही ती तिजोरी मी बंजारा विकासासाठी खुली करू. बंजारा समाजाच्या गोड बोलीचं संवर्धनही सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com