Bhagat Singh Koshyari Resign : राज्यपाल भवन हे 'भाजप भवन' झालं होतं, महाराष्ट्र पापातून मुक्त झाला - नाना पटोले

Bhagat Singh Koshyari Resign : मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nana Patole on Bhagat Singh Koshyari Resign
Nana Patole on Bhagat Singh Koshyari Resign saam tv
Published On

Bhagat Singh Koshyari Resign : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यपाल भवन हे 'भाजप भवन' झालं होतं, महाराष्ट्र पापातून मुक्त झाला, अशा शब्दात नाना पटोलेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाना पटोले म्हणाले की "भाजपने राज्यपालांकडून जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी बदनामी करून घेतली. महापुरुषांबाबत टिंगल आणि वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल करत होते. भारतीय जनता पार्टीने राज्याची बदनामी करण्यासाठी मुद्दाम असे राज्यपाल बसवले होते. राज्यपालांनी केलेल्या अपमानाचा बदला महाराष्ट्र कसा घेईल,"असेही पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

Nana Patole on Bhagat Singh Koshyari Resign
Bhagat Shingh Koshyari Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल

"नवं सरकार बनवण्याबाबत कोणतंही निमंत्रण पत्र नव्हतं"

सुप्रिया सुळे यांनी म्हटलेले 'देर आये दुरुस्त आये' हे वाक्य राज्यपालांच्या या घटनेत लागू होत नाही, असेही पटोले म्हणाले. राज्यात नवीन सरकार बनवण्याबाबत कोणतेही निमंत्रण पत्र दिले नव्हते ही बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे, असा दावा देखील पटोले यांनी यावेळी केला. "नवीन राज्यपालांकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा अशी अपेक्षा आहे. काँग्रेस रमेश बैस यांच्यासोबत आहे," असेही ते म्हणाले. (Maharashtra Political News)

Nana Patole on Bhagat Singh Koshyari Resign
Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?

"अमित शाहांना प्रचारासाठी यावं लागतं हे दुर्दैवं"

पुण्यात पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रचाराला यावं लागतं याचाच अर्थ भाजप बाबत जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. अमित शहा यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी यावं लागतं यापेक्षा मोठं दुर्दैवं कोणतच नाही, अशी टिका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com