मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा एकमेव जवळचा मार्ग म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले पूल. मात्र हा पूल मागील चार वर्षांपासून तोडून नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम प्रचंड धीम्या गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी काका पटेल हे आक्रमक झाले. पंधरा मे पूर्वीपर्यंत जर या पुलाचे काम पूर्ण केले नाही, तर गोखले पुलाचे काम पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा आमदार मुरजी पटेल यांनी दिला आहे. पटेल यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत गोखले पुलावर जाऊन पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले फुलाचा एक कठडा पडल्यामुळे पालिकेने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. यानंतर 2021 मध्ये हा पूल पूर्णपणे तोडून नव्याने बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या अभियंत्यांकडून या पुलाच्या नकाशा आणि जोडणीत मोठा गोंधळ निर्माण झाल्यामुळे पूल पुन्हा तोडून काही भाग नव्याने निर्माण करण्यात आला. यावेळी पालिका अभियंत्यांवर सर्वच स्तरातून मोठी टीका देखील झाली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले फुलाची एक बाजू घाईगडबडीत सुरू करण्यात आली. याच मार्गावरून मध्ये दुभाजक टाकून पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी एक एक मार्गिका सुरू केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र दुसऱ्या बाजूचा रेल्वे हद्दीतील पूल जोडण्यासाठी रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर मेगाब्लॉक देखील घेण्यात आले. तरीसुद्धा काम वेळेत पूर्ण झाले नाही. यामुळे चार वर्षे उलटून गेल्यानंतरही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी आज महापालिकेचे अधिकारी अंतराळदार यांच्यासोबत प्रत्यक्ष गोखले पुलावर कामाच्या ठिकाणी जाऊन कामाचा आढावा घेतला यावेळी कंत्राट दाराकडून पुलाचे काम 15 मे रोजी पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती आमदार पटेल यांना दिली मात्र यावेळी पालिका अधिकारी आणि कांत्राटदाराच्या उत्तराने आमदार पटेल यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत हा पूल जर 15 मे रोजी पर्यंत काम पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत आला नाही, तर मात्र शिवसेना स्टाईलने आंदोलन करून हे काम पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा आमदार मुरजी पटेल यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.