Jitendra Awhad, Sharad Pawar
Jitendra Awhad, Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावे; जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Election) चर्चा सुरू झाली आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईत भेट घेतली. युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. (Presidential Election Sharad Pawar)

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, मी गेली ३५ वर्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. पवार साहेब हे राष्ट्रपती म्हणून प्रोडक्टच नाही. जो माणूस दोन दिवसांच्या वर घरी बसत नाही. तो माणूस राष्ट्रपती भवनात बसूच शकत नाही. २०२४ मध्ये जी संयुक्त आघाडी करावी लागणार आहे.

ती आघाडी करण्याची जबाबदारी जर आजच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टाकली, आणि ती शरद पवार यांनी स्विकारली तर मोठा बदल तुम्हाला या दोन वर्षात दिसेल. मुख्य प्रवाहातून शरद पवार यांनी बाहेर जावून चालणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थ असणार, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानेही शरद पवार यांच्या नावाला समर्थन दाखवले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. (Sharad Pawar latest News)

काँग्रेस नेत्यांचे समर्थन

युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थन असणार, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षानेही शरद पवार यांच्या नावाला समर्थन दाखवले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीवर मुंबईत खलबते

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा निरोप घेऊन मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. सर्व पक्षांची बैठक घेऊन एक उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे , टीएमसी, समाजवादी पक्ष या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी सांगितले असल्याचे बोलले जात आहे. वेळ आणि दिवस ठरवून तारीख घेऊ आणि बैठक घेऊ, असंही खरगे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT