पुणे : जम्मू काश्मीरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेत आणि 'लष्कर ए तोयबा' या संघटनेत कार्यरत कार्यरत असणाऱ्या एकाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक करून मोठी कारवाई केली आहे. एटीएसने दहशतवादी (Terrorist) संघटनेशी संबंधित असलेल्या एकाला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. एटीएसने या आधी पुण्यातील दापोडी येथून दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एकाला काश्मीरमधून दोघांना अटक केली होती. त्यानंतर एटीएसने आणखी एकाला बेड्या ठोकून मोठी कारवाई केली आहे. ( Pune Latest Crime News In Marathi )
इनामूल हक असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर याआधी लष्कर ए तोएबाशी संबंधित असण्याचा संशयावरून एटीएसने जुनैद महंमद (वय 28, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर,खामगाव, बुलढाणा) आणि आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) या दोघांना अटक केली होती. पथकाने त्यांच्याकडून आठ मोबाईल जप्त केले होते.
दरम्यान, दहशतवादी कारवाया करण्यासाठी शाह व उमरने त्याच्या बॅंक खात्यामध्ये पैसे टाकले होते. त्या पैशातूनच त्याने शस्त्र खरेदी केले होते. तसेच, जुनैदने त्याला मिळालेल्या पैशातून नवीन मोबाईल घरेदी केला होता. त्यानंतर जुनैदने फेसबुकवर बनावट खाते तयार केले होते. त्याद्वारे जुनैद, शाह, उमर असे तिघे लष्कर-ए-तोयबा या बंदी असलेला संघटनेत नवीन तरुणांची भरती करण्यासाठी आणि त्यांना दारूगोळा, शस्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. मात्र, तिघांना एटीएस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
'आरोपी हा मूळचा झारखंडचा राहणार आहे .त्याला न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो आरोपी हा जुनैदच्या संपर्कात होता. याची नियुक्ती देखील जुनैदने केली', असे पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. त्याचबरोबर जे दहा हजार रुपये जुनैदच्या खात्यात आले होते. त्यापैकी काही रक्कम याला दिली आहे का याचा तपास आता पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर हा आरोपी पाकिस्तानातील उमर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं देखील पोलीस सांगत आहे, अशी माहिती यशपाल पुरोहित या आरोपींच्या वकिलांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.