IND Vs SA: दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारताच्या (Team India) पराभवात दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेनने जबरदस्त कामगिरी केली आणि त्याने 46 चेंडूत 81 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. क्लासेनने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 सिक्सर मारले. या सामन्यात जिथे हेनरिक क्लासेनने आपली खेळी दाखवली, तसेच आफ्रिकन गोलंदाज वेन पारनेलने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ज्या पद्धतीने आऊट केले त्यावेळी पारनेलने मैदानावरच सेलिब्रेशनला सुरुवात केली. हार्दिकला पारनेलने बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे या सामन्यात हार्दिकला केवळ 9 धावाच करता आल्या.
13व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर वेन पारनेलने हार्दिकला बोल्ड केले, त्यानंतर गोलंदाजाने त्याच्या हाताने हृदयाचे चिन्ह दाखवून विकेट साजरी केला. वेन पारनेलने साजरा केलेल्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पारनेलने केलेल्या या हावभावाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगत आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये केवळ 148 धावा केल्या, भारतातर्फे दिनेश कार्तिकने 21 चेंडूत 30 धावा आणि श्रेयस अय्यरने 35 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. भारत स्वबळावर 148 धावा करण्यात यशस्वी झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने 18.2 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.
5 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या T20 सामन्यातही भारताचा पराभव केला होता आणि आता या मालिकेतील तिसरा सामना 14 जून रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.