सरकारी पाहुण्यांची चिंता आम्हाला नाही- शरद पवार  Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र सरकारकडे 3000 कोटींची थकबाकी आहे, हे मान्य आहे- शरद पवार

शरद पवार (Sharad Pawar) आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलताना त्यांना केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: शरद पवार (Sharad Pawar) आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलताना त्यांना केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. ते बोलताना म्हणाले ''बऱ्याच वर्षांनी मी पिंपरीत आलो आहे. चार वेळा मला इथून जनतेनें लोकसभेत पाठवलं. सामान्य जनतेचे प्रश्न वाढत आहेत. मात्र केंद्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नांची आस्था नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याच साधन आहे त्याचबरोबर हा दृष्टीकोण केंद्रातील भाजप सरकारने स्वीकारला असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

...'ही' वस्तुस्थिती आहे ती मान्य आहे.

महाराष्ट्रामधील विज संकटावर बोलताना शरद पवार म्हणाले ''महाराष्ट्र सरकार कडे तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. म्हणून कोळसा समस्या निर्माण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे ती मान्य आहे. ती थकबाकी आठ-दहा दिवसांत दिली जाईल त्याची तरतूद केली आहे''. मात्र केंद्राकडे राज्याचे 35 हजार कोटी बाकी असल्याच्या मुद्याकडे पवारांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे कोळश्याचे तीन हजार कोटी राज्यकडे बाकी आहेत, म्हणून आरोप करायचा. मात्र केंद्राकडे 35 हजार कोटी बाकी आहेत त्या विषयी काहीही बोलायचे नाही असा आरोप पवारांनी बोलताना केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह- पवार

आज पुन्हा एका बोलताना पवारांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहेत. ते म्हणाले ''केंद्र सरकार केंद्रीय संस्थाच गैर वापर करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले त्यांनी लगेच राजीनामा दिला. मात्र ज्या कमिशनर ऑफ पुलीस ने आरोप केले ते आरोप केल्या पासून आता पर्यंत गायब आहेत. केंद्र सरकार ते कुठे गेले याची चौकशी करत नाही. ते देश सोडून गेले की कुठे गेले या विषयी केंद्र सरकार का माहिती घेत नाहीत, केंद्रा कडे बाहेर देशात माहिती घेणाऱ्या संस्था आहेत. त्यांनी परमबीर सिंग यांची माहिती घ्यावी अशी सुचना पवारांनी केंद्र सरकारला दिली आहे.

'काही दिवसांपुर्वी ED लोकांना माहित नव्हती'

इडी सारखी काहीतरी संस्था आहे, हे काही वर्षांपूर्वी खूप कमी लोकांना माहित होतं. मात्र आज इडीचं नाव रोज ऐकायला येते. आणखी एका संस्थेचे नाव रोज ऐकायला येतं ते म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. आमचे प्रवक्त्ते नवाब मलिक यांच्या जावयाच्या मागे एनसीबी चा ससेमिरा लावून त्रास दिला. परंतु त्यांना जामीन मिळाला अशा शब्दात शरद पवारांनी तपास यंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. Ncb च्या कारवाई वर शरद पवार यांनी टीका केली आहे. NCB कारवाई करताना जे पंच आणते, ते पंच स्वतः गुन्हेगार आहेत. पंच गुन्हेगार आहे कळल्या नंतर ते पंच लगेच फरार झाले, ते पंच आज सापडत नाहीत. अशाच एका पंचा विरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गुन्हेगार पार्श्वभूमी असलेलं पंच आणायचे आणि चांगल्या लोकां विरोधात खोटे नाटे पुरावे तयार करून गुन्हे दाखल करायचे असा आरोप पवारांनी तपास यंत्रणांवर केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT