उल्हासनगरात पैशाच्या वादातून दोघांवर जिवघेणा हल्ला; पोलिसावरही चाकूने वार

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
उल्हासनगरात पैशाच्या वादातून दोघांवर जिवघेणा हल्ला; पोलिसावरही चाकूने वार
उल्हासनगरात पैशाच्या वादातून दोघांवर जिवघेणा हल्ला; पोलिसावरही चाकूने वारSaam tv news
Published On

उल्हासनगर: पैशांच्या व्यवहारावरून दोघांना मारहाण सुरू असताना हे भांड सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सेक्शन ३० मध्ये १५ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता ३ जण मिळून अविनाश नायडू आणि संजय शितलानी या दोघांना मारहाण करत होते. याच वेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश डमाले आणि गणेश राठोड हे दोघे गस्त घालत असताना तिथे पोहोचले.

उल्हासनगरात पैशाच्या वादातून दोघांवर जिवघेणा हल्ला; पोलिसावरही चाकूने वार
जुन्नरमध्ये तरुणीचा खून तर आंबेगावमध्ये अपघाताचा बनाव करत तरुणाची हत्या

काही व्यक्ती दोन जणांना चाकूने मारत असल्याचं पाहून हे दोघे या भांडणात पडले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी हल्लेखोर नरेश लेफ्टी, ओमी आणि शशी चिकना उर्फ सुखी या तिघांनी अविनाश नायडू आणि संजय शितलानी यांना सोडून पोलिसांवरच हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी गणेश डमाले यांच्या गालावर वार झाल्यानं त्यांचा जबडा फाटला. दरम्यान, हा प्रकार घडला त्यावेळी दोन्ही पोलीस कर्मचारी हे साध्या वेशात होते. त्यामुळे त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला, मात्र हे दोघे पोलीस असल्याचं समजताच हल्लेखोर तिथून पळून गेले. या भांडणात गणेश डमाले हे पोलीस कर्मचारी तर जखमी झालेच, पण अविनाश नायडू आणि संजय शितलानी हे दोघेही गंभीर स्वरूपात जखमी झाल्यानं त्यांना थेट मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर पोलीस कर्मचारी गणेश डमाले यांना कल्याणच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या हल्ल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी हल्लेखोर नरेश लेफ्टी, ओमी आणि शशी चिकना उर्फ सुखी या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणत गंभीर स्वरूपाची दुखापत करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. या हल्ल्यानंतर तिन्ही हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी ४ पथकं रवाना केल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com