sharad pawar mandal Yatra Saam tv
मुंबई/पुणे

Mandal Yatra : शरद पवारांच्या मंडल यात्रेत पाकीटमारांचा सुळसुळाट; शहर अध्यक्षांच्या खिशातून २० हजार लंपास, तावडीत सापडताच चांगलाच चोपला

sharad pawar mandal Yatra : शरद पवारांच्या मंडल यात्रेत पाकीटमारांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या यात्रेतून पाकीटमारांनी शहर अध्यक्षांचं पाकीट लंपास केलं.

Vishal Gangurde

नागपुरात शरद पवार यांच्या मंडलयात्रेदरम्यान पाकीटमारीची घटना घडली.

नागपूरचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंच्या खिशातून २० हजार रुपयांची चोरी झाली.

चोरट्याला पकडून कार्यकर्त्यांनी मारहाण

गर्दीचा फायदा घेत आणखी काही पाकीटमारी झाल्याचा संशय

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : राज्यात एकीकडे मराठा आंदोलनाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी ओबीसी कार्ड टाकलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून शरद पवार गटाच्या मंडल यात्रेचा श्रीगणेशा झाला. या यात्रेत एका पाकिटमाराने शहर अध्यक्षांच्या खिशातून २० हजार लंपास केले. पाकीटमार तावडीत सापडल्यानंतर कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघाली. शरद पवारांनी मंडल यात्रेला झेंडा दाखवून रवाना केले. त्यानंतर मंडल यात्रा व्हेरायटी चौकावर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर पोहोचली. या दोन्ही ठिकाणी गर्दीचा फायदा घेत काही पाकीटमारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांच्या खिशातून रोख रक्कम किंवा पर्स लंपास झाली. त्यामुळे यात्रेत पाकीटमार शिरल्याची शंका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार मंडल यात्रेसोबत व्हेरायटी चौकावर असताना असाच एक पाकीटमार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडला. तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलं चोप दिला. त्याच्याकडून चोरलेला पाकीट जप्त केले. त्यानंतर पाकीटमारा मारत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तातडीने या पाकीटमाराला ताब्यात घेतलं.

मंडल यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या खिशातूनही 20 हजारांची रक्कम चोरट्यांनी आज लंपास केल्याचे समोर आले आहे. या पाकीटमारांनी आणखी किती जणांच्या पैशांवर डल्ला मारला, याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार यांच्या मंडल यात्रेदरम्यान काय घडलं?

नागपुरात मंडल यात्रेदरम्यान एका पाकीटमाराने २० हजार रुपये चोरले.

चोरी कोणाच्या खिशातून झाली?

शरद पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या खिशातून रक्कम चोरी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Live News Update: नाशिकला २ दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट, गणपती विसर्जनावर पावसाचं सावट

GST Council: दिवाळीआधीच धमाका! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी

Tilgul Modak Recipe : सुबक कळीदार तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन गणपती होईल खुश

Nagpur Explosion : मध्यरात्री नागपूरमध्ये RDX प्लांटमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू, १७ जण जखमी, सहा जण ICU मध्ये

SCROLL FOR NEXT