
Operation Akhal Update: जम्मू-काश्मीरच्या कुलगामच्या अखल भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये चममक सुरु आहे. मागील ९ दिवसांपासून अखलमध्ये ही चकमक सुरु आहे. शुक्रवारी रात्री भीषण स्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. देशात एकीकडे रक्षाबंधन साजरा होत असताना दुसरीकडे २ जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. तर १० सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर एका दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात यश आलं आहे. सैन्य दलाने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
काही दिवसांपूर्वी अखलमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केलं होतं. ऑपरेशनदरम्यान काल रात्री दोन जवान शहीद झाले. या चकमकीत प्रितपाल सिंह आणि हरमिंदर सिंह हे जवान शहीद झाले. तर १० जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्कराचे दोन जवान शहीद झाल्यानंतरही ऑपरेशन सुरु आहे. घनदाट जंगलात आणखी दहशतवादी लपल्याची माहिती मिळत आहे.
अखलमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एसओजी, जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य दल आणि सीआरपीएफचे जवानसोबत ऑपरेशन अभियान राबवत आहेत. या ऑपरेशनची माहिती चिनार कॉर्प्सद्वारे 'एक्स'वर माहिती शेअर केली जात आहे. दहशतवाद्यांकडून सुरुवातीला अधूनमधून गोळीबार केला जात होता. त्यानंतर जवानांनी गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं. जवानांनी हळूहळू घेरण्यास सुरुवात केली.
एलओसीजवळ शोधमोहिम सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर सुरक्षा दलाला जंगलात २-३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.