Friday Horoscope : नारळी पौर्णिमेच्या शुभ दिवसाला आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांची आर्थिक भरभराट होईल

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. तर काहींची आर्थिक भरभराट होईल. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

शुक्रवार,८ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष,नारळी पौर्णिमा, वरडलक्समीव्रत

तिथी-चतुर्दशी १४|१३

रास- मकर

नक्षत्र-उत्तराषाढा

योग-आयुष्मान

करण-वणिज

दिनविशेष-१४ प.चांगला

मेष - आज नारळी पौर्णिमा.आजच्या दिवसाची केलेल्या पूजा आणि व्रते ही विशेषत्वाने उत्तम फलित देतात.विष्णू उपासना करावी. एखाद्या नव्या संकल्पने आज भारलेले राहाल. चांगल्या गोष्टी कानावर येतील. समाधानकारक दिवस राहील.

वृषभ - आपल्या राशीला पैशाचे विशेष महत्त्व आहे. त्याच्यासाठी विशेष कष्ट आणि मेहनत आज घ्याल. मात्र वाम मार्गातील पैसे मिळवणे आज टाळा. अन्यथा "आ बैल मुझे मार" अशी अवस्था होईल.

मिथुन - नवनवीन कल्पना आणि संकल्पना यांनी भरलेला आजचा दिवस आहे. व्यावसायिक जोडीदाराबरोबर काही महत्त्वाचे निर्णय होतील. जे पुढील व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. आयुष्याच्या जोडीदाराबरोबर योग्य साथ मिळाल्यामुळे दिवस आनंदी राहील.

horoscope in marathi
Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; नोंदणी अन् अर्ज कुठे कराल? जाणून घ्या

कर्क - जलतत्त्वाची आपली रास विशेष भावनिक सुद्धा आहे. आज नारळी पौर्णिमेनिमित्त संकल्प करून पाण्याजवळ देवतांचे उपासना केल्यास अधिक फळ मिळेल. आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी आज दूर होण्याचा दिवस आहे. सजग रहा.

सिंह - आपण न ठरवता काही गोष्टी होतात म्हणजेच कुठेतरी आपल्याला देवाचं उत्तम आशीर्वाद आहेत. हे आज तुम्हाला जाणवेल. पूर्वसंचित आणि प्रारब्ध याविषयी विशेष मनात खल चालू राहील. इतरांना आपला आधार वाटेल. धनयोग उत्तम आहेत.

कन्या - हिशोब करून पुढे जाणे आज बरे राहील. आपल्या जवळच्या व्यक्तींकडून याबाबतीत सहकार्य मिळेल. शेतीवाडी प्रॉपर्टीच्या व्यवहारात विशेष फायदा होण्याचा आजचा दिवस आहे.

horoscope in marathi
Trigrahi Yog: मीन राशीत तयार होणार त्रिग्रही राजयोग; 'या' ३ राशींच्या व्यक्ती गडगंज श्रीमंती अनुभवणार

तूळ - पर्यटन ही आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे. आज कामाबरोबर हा आनंद सुध्दा लुटाल.जवळचे प्रवासही घडतील. आवडत्या व्यक्तीबरोबर प्रवास झाल्यामुळे दिवस आनंदी राहील.महत्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्चिक - नाती जोडताना कोणतीही फायदा आपण विचारात न घेता त्यांच्यासोबत असता. आज याचाच तुम्हाला फायदा होईल. वेळेला आपले लोक पाठीशी खंबीर उभे राहतील. कौटुंबिक सौख्य उत्तम आहे.

धनु - नवे संकल्प करणे. व्यायाम, शरीरसंस्था जपणे याकडे आज तुमचा विशेष कल राहील. स्वतःच्या आनंदासाठी अनेक गोष्टी कराल. इतरांचे करून खूप झाले असेही भावना येईल. दिवस समाधानकारक आहे.

horoscope in marathi
Office Vastu Tips: ऑफिसच्या टेबलावर या वस्तू कधीही ठेवू नका, करिअर आणि आरोग्यासाठी त्रासदायक

मकर - नको तिथे पैसे खर्च करणे आज टाळलेले बरे. त्याचबरोबर आपले मौल्यवान ऐवज आणि जिन्नस जपणे आज गरजेचे आहे. विनाकारण काहीतरी फटका बसण्याची आज शक्यता आहे. मनस्थिती सांभाळा.

कुंभ - मैत्रीमध्ये सौहार्दाने वागाल. कामाच्या ठिकाणी काहीतरी संशोधनात्मक घडामोडी आपल्याकडून घडतील. ठरवलेल्या गोष्टी तशाच झाल्यामुळे मन आनंदी राहील.अनेक लाभ होतील.

मीन - प्रेमामध्ये अडथळे येण्याचा संभव आहे. पण कुटुंबीयांच्या सहकार्याने मनस्थितीवर मात कराल. कार्यक्षेत्रामध्ये विशेष बाजी आज आपण मारणार आहात. आयुष्य हा सुखदुःखाचा खेळ आहे हे आज जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com