Shocking : डोंबिवलीत खळबळ; तरुणाने एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी, लोकांची धावाधाव

Dombivli Shocking News : डोंबिवलीत तरुणाने एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचं समोर आलं आहे. तरुणाच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली.
Dombivli news
Dombivli ShockingSaam tv
Published On

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारल्याची घटना घडली आहे. तरुणाने उडी मारल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. तरुणाने उडी का मारली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

डोंबिवलीत आज गुरुवारी एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारली. तरुणाने उडी मारल्याने रुग्णालय प्रशासनाची एकच धावाधाव झाली. तरुणाविषयी अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही. तरुण रुग्णालयातील रुग्ण होता का, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या तरुणाच्या उडी मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Dombivli news
Pranjal khewalkar : खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 234 अश्लील फोटो अन् व्हिडिओ, मोलकरणीचाही व्हिडिओ; चाकणकरांची खळबळजनक माहिती

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

लाल रंगाचं टी-शर्ट घातलेला तरुण चौथ्या मजल्यावर उभा आहे. प्रथमदर्शनी तरुण दारुच्या नशेत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमधील तरुण उडी मारायची तयारी बेतात असताना अनेक जणांनी खालून आवाज दिला. रस्त्यावर उभे असलेले लोक त्याला खिडकीतून पुन्हा जाण्यास सांगत आहे. तरुण लोकांचं ऐकताना दिसत आहे. काही वेळ ड्रामा झाल्यानंतर या तरुणाने चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

Dombivli news
Dadar kabutar khana : कबूतरप्रेमींना दणका! कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम, कोर्टाने काय म्हटलं?

तरुणाने उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं जात आहे. तरुणाच्या प्रकृतीविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या तरुणाच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com