Sharad Pawar On India Name Change Controversy saam tv
मुंबई/पुणे

India vs Bharat Row: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

Sharad Pawar On Pm Modi: गेट ऑफ इंडियाला काय म्हणायचं? शरद पवारांचा 'इंडिया' नाव बदलण्यावरून मोदींवर निशाणा

Satish Kengar

Sharad Pawar On Pm Modi:

''तुम्ही (पंतप्रधान मोदी) इंडिया या नावाने किती योजना काढल्यात? आता गेट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आता काय म्हणायचं'', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडी नावानंतर केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख 'प्रेसिडेंट ऑफ भारत', असा केला होता. यावरून देशाचे नाव इंडिया बदलून भारत असं केलं जात आहे का? असा वाद निर्माण झाला आहे. यावरच बोलताना वाय बी सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले की, ''समाजाच्या महत्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करायचं आणि नाही त्या प्रश्नांना महत्व द्यायचं, हा दृष्टिकोन सध्याच्या राज्यकर्त्यांचा आहे. यातूनच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.''  (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलं आहे. आपल्या उत्तरात शरद पवार गटाने अजित पवारचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 9 मंत्र्यांसह 31 आमदारांंविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

यात पहिल्यांदा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल आपलं मौन सोडलं आहे. ते म्हणाले आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार यांनी घातलेली भूमिका विरोधाभासी आहे. त्याच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT