sharad pawar Saam tv
मुंबई/पुणे

शरद पवार मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

sharad pawar news : शरद पवार मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीविषयी सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली.

Vishal Gangurde

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू

रुग्णालयाच्या अहवालानंतर पवारांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती समोर येणार

खासदार शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या देखील सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांचा बारामती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांनी आज मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितनीनुसार, शरद पवार यांना नियमित तपासणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या विविध चाचण्या सुरू आहेत. रुग्णालयात अहवाल आल्यानंतर प्रकृतीबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल.

तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज मंगळवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या अलीकडील प्रकृतीचा विचार करत रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केले आहेत. रुग्णालयाचा वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरील उपचार आणि डिस्चार्जबाबत माहिती समोर येईल. शरद पवार यांच्या सोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझा भाऊ गेलाय. आजही अंगावर काटा येतो. अनेक वेळा असे वाटते की दादा गेला का? खरंच दादा गेला की नाही, अशी भावना निर्माण होते. विमान पडले कसे? दादा कसे गेले, असे प्रश्न निर्माण होतं आहे. सभा जुन्या ठिकाणी खाली बसून घरगुती कार्यक्रम असतो. फॉर्म भरून शेवटच्या सभेला दादा आणि साहेब येत असतात. नात्यात कधीही अंतर आलेले नाही. काल आज आणि उद्या वैयक्तिक संबंध राजकारणात कधीच येऊ दिली नाहीत. मला आज दुःख होतं आहे. मी जड अंतःकरणाने, मी बारामतीला जाते आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT