डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक... Saam Tv News
मुंबई/पुणे

डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सहा जणांना अटक...

डोंबिवलीच्या सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत सेक्स रॅकेट चालू असल्याने आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेत (dombivali east) सांगर्ली (sangarli) येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये सेक्स रॅकेट (sex racket in lodging and boarding) चोरी-छुपे चालू असल्याचे केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या कारवाईत चौघा तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत हे चालू असल्याने डोंबिवलीत आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना (Tilak Nagar Police - Dombivali) याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. (sex racket exposed in dombivali, six arrested)

हे देखील पहा -

डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत (Balaji darshan building) आहे. या इमारतीत हॉटेल विराज साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची बातमी मिळताच ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने (anti human trafficking cell) सोमवारी रात्री अचानक तेथे छापा टाकला. यावेळी चार तरुणी तेथे वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत हे चालू असल्याने डोंबिवलीत आता खळबळ माजली आहे. टिळकनगर पोलिसांना याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. तर या कांडातून मुक्त करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली. टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या विरोधात 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT