SET Exam 2026 New Date Saam Tv
मुंबई/पुणे

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SET Exam 2026 New Date: पुणे विद्यापीठाने सेट परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा पुढे ढकलली. ही परीक्षा २७ सप्टेंबरला होणार होती. पण आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

Priya More
  • सेट परीक्षा २०२६ ची तारीख पुन्हा बदलली

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेची नवीन तारीख जाहीर

  • २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार परीक्षा

  • महाराष्ट्र सेट परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली

सचिन जाधव, पुणे

सेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आता २५ ऑक्टोबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्यांदा या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे त्यामुळे परीक्षा देणारे संतप्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सेट' विभागातर्फे सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणारी ४१ वी सेट परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. परीक्षार्थीच्या हिताचा आणि परीक्षा आयोजनातील सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आले असल्याचे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 'सेट' परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. मात्र,एमपीएससी परीक्षा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलून ६ सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सीटीईटी होणार असल्याने पुन्हा परीक्षेची तारीख बदलून २७ सप्टेंबर करण्यात आली होती. पण आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

२७ सप्टेंबरच्या आसपास केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी); तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षेची तारीख पुणे विद्यापीठाकडे बदलण्याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनानंतर ही परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी गद्दार , संजय राऊतांचा इशारा

Maharashtra News Live Update: भुसावळात भैरू वाईन अँड बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई!

अमिताभ बच्चन यांना पाचव्यांदा घरावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी; दिलजीतच्या शोवरून ३० दिवस ग्रेनेड हल्ल्यांचा इशारा!

28 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; गुन्हेगारांवर वचक बसणार? कोणाची कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती?

Bike Maintenance: बाइक रोज चालवणं चांगलं की आठवड्यातून काही दिवस बंद ठेवणं?

SCROLL FOR NEXT