Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Pune Doctor End Life: पुण्यात डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. ९ व्या मजल्यावरून उडी मारत तिने आयुष्य संपवलं. पोलिस सध्या तपास करत आहेत.
Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Pune Doctor End LifeSaam Tv
Published On
  • पुण्यात २१ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

  • मूळची हैदराबाद येथे राहणाऱ्या माया रेड्डीने पुण्यात आयुष्य संपवलं

  • भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती

  • इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून तिने उडी मारली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने ९ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माया रेड्डी असं या डॉक्टर तरुणीचे नाव होते. माया रेड्डी ही भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माया ही मूळची हैदराबाद येथील रहिवासी होती. ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. कात्रज परिसरातील एका सोसायटीमध्ये ती भाड्याने घर घेऊन राहत होती.

Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

आज दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास माया रेड्डीने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. जास्त रक्तस्राव झाल्याने माया रेड्डीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

माया रेड्डीने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. माया रेड्डीच्या आत्महत्येमागे अभ्यासाचा ताण होता का? अथवा यामागे अन्य काही कारण आहे का? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, ९ व्या मजल्यावरून मारली उडी
Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com