'ST कर्मचाऱ्यांबाबत भाजपाची भूमिका कशी बदलते पहा..' सचिन सावंतांनी शेअर केला Video SaamTV
मुंबई/पुणे

'ST कर्मचाऱ्यांबाबत भाजपाची भूमिका कशी बदलते पहा..' सचिन सावंतांनी शेअर केला Video

या व्हिडीओ मध्ये भाजपनेते कायद्यानी विलीनीकरण करता येत नाही, मदत करता येईल. मात्र विलीनीकरण करता येत नाही असं ते वारंवार म्हणत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : ST कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अवमान याचिका दाखल केल्यावर देखील एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले तरी एसटी कामगार कामावरती रुजु झाले नाहीत. (See how BJP's role changes regarding ST employees' Sachin Sawantani shared Video)

पहा व्हिडीओ -

अशातच आता भाजप नेत्यांनी (BJP Leaders) या संपाला पाठबळ दिल्याने राज्यशासनेची चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच आज प्रवीण दरेकर आणि गोपिचंद पडळकर यांनी देखील आंदोलनाला पाठींबा दर्शवत भाषण केली आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी मात्र सुधीर मुनंगटीवार (Sudhir Munangatiwar) यांचा एक व्हिडीओ ट्विट (Video Tweet) करत भाजपा नेते ST कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले आहेत उच्च न्यायालयाने संपावर बंदी घालून समिती गठीत केली व राज्य सरकारने इतर मागण्या मान्य केल्या. मग आंदोलन का? असा सवाल उपस्थित केला असून एसटी कर्मचाऱ्यांनी अशा संधीसाधूंना थारा देऊ नये. भाजपाच्या भूमिका कशा बदलतात ते पहा. असं म्हणत त्यांनी #महाराष्ट्रद्रोही_भाजपा असा हॅशटॅग HashTag देखील दिला आहे. दरम्यान या व्हिडीओ मध्ये भाजपनेते सुधीर मुनंगटीवार कायद्यानी विलीनीकरण करता येत नाही, मदत करता येईल. मात्र विलीनीकरण करता येत नाही असं ते वारंवार म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT